शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By

लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल या 5 गोष्टी नक्की वाचा

लिव्ह-इन रिलेशनशिप अर्थातच आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. एकमेकांना जाणून घेण्यासाठी हा पर्याय योग्य असला तरी या रिलेशनमध्ये पडण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहेत. 
 
आधी मैत्री नंतर लिव्ह-इन
लिव्ह-इन रिलेशनपूर्वी आपल्या पार्टनरचा स्वभाव जाणून घेणे आवश्यक आहे. पार्टनरचे भावना आणि मूडबद्दल कल्पना असावी. मैत्रीच्या रूपात वेळ घालवावा आणि नंतर जुळत असल्यास पुढचं पाऊल उचलावं. मनात जरा ही शंका असल्यास नात्याला अजून वेळ द्या आणि मग ठरवा. 
 
रागात मर्यादा ओलांडू नका
नातं म्हटलं की थोडा तर ताण येणारच. याने नाते मजबूत होतात परंतू लिव्ह-इन रिलेशनमध्ये अशी स्थिती निर्माण झाल्यास रागात वायफळ बडबड करू नये. अनेकदा क्रोधात व्यक्ती वाटेल ते बोलत सुटतो परंतू जिभेवर ताबा ठेवणे गरजेचे आहे. कारण वेळ निघाल्यावर देखील त्या गोष्टी मनातील एखाद्या कोपर्‍यात दाटून राहतात. राग आल्यावर हे लक्षात ठेवा की एकमेकावर विश्वास असल्यामुळे हा निर्णय घेतला गेला. 
 
खर्च वाटून घ्या
हल्ली महागाई इतकी आहे की चांगल्या लाइफस्टाइलसाठी पुरेसा पैसा असणे गरजेचे आहे. एकट्यावर भार टाकल्यामुळे ताण निर्माण होऊ शकतो. अशात रिलेशनमध्ये पडण्यापूर्वीच खर्च वाटून घेणे योग्य ठरेल. 
 
मानसिक तयारी असावी
अशा रिलेशनमध्ये राहण्यासाठी मानसिक तयारी असली पाहिजे. अनेकदा आपल्याला पार्टनरच्या काही सवयी आवडणार नाहीत तरी त्यावर वाद न घालता समाधान काढणे योग्य ठरेल. काही गोष्टी दुर्लक्ष देखील कराव्या लागतील. तसेच समाजाला सामोरा जायची पण तयारी असली पाहिजे. कारण जग किती जरी आधुनिक झालं असलं तरी टोकणारे आणि अशा रिलेशनला नकारणार्‍यांची अजूनही कमी नाही. 
 
कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहावे
आपण रिलेशनमध्ये असल्यावर पार्टनरचा कल्पना नसलेला खरा चेहरा दिसू लागला तर इमोशन्सवर ताबा ठेवून त्यातून बाहेर पडण्याची तयारी ठेवावी लागेल. ठराविक गोष्टी पलीकडे मुद्दे जात असल्यास किंवा विपरित परिस्थिती निर्माण होत असल्यास दुसर्‍या लाईफसाठी तयार राहावे.