Relitionship Tips : या समस्या अनेकदा वैवाहिक जीवनातील नात्यात दुरावा आणतात
पती-पत्नीचे नाते खूप नाजूक असते. आजच्या नात्यांवर नजर टाकली तर कधी कधी एखादी छोटीशी गोष्ट खूप मोठी होते, त्यामुळे जोडप्यांमध्ये भांडण सुरू होते. अनेक वेळा नात्यातील अडचणी इतक्या वाढतात की नातं संपुष्टात येतं. या काही समस्या वैवाहिक नात्यातील समस्या वाढवतात आणि नात्यात दुरावा आणतात.
1 तणाव सहन करण्याची क्षमता- नात्यात असे प्रसंग येऊ शकतात की पुढे काय होईल हे समजत नाही, अशा परिस्थितीत ज्या लोकांमध्ये तणाव सहन करण्याची ताकद नसते, ते परिस्थितीपासून दूर पळतात. यामुळे नातेही बिघडू शकते.
2 असुरक्षित असणे-जर आपला जोडीदार आपल्याला काही गोष्टी करण्यापासून थांबवत असेल तर त्याला आपल्या मुळे असुरक्षिततेची भावना वाटू शकते. अनेक वेळा असे घडते जेव्हा पार्टनरचा आपल्यावर विश्वास कमी असतो, तर काहीवेळा असे घडते जेव्हा पार्टनरला असे वाटू लागते की आपले ध्येय आपल्याला खूप यश मिळवून देईल त्यामुळे आपण त्याच्यापेक्षा अधिक यशस्वी व्हाल. आणि यामुळे नात्यात दुरावा येतो.
3 कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात अयशस्वी- लग्नामुळे आपल्यावर अनेक जबाबदाऱ्या येतात. आणि जर आपण या जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत तर दोघांमध्ये भांडणे सुरू होतात.
4 वेळेचा अभाव - पती असो वा पत्नी, दोघांनाही जोडीदाराचा वेळ हवा असतो. पण कधी-कधी हे दोघे इतके व्यस्त होतात की एकत्र बाहेर फिरायला जाऊ शकत नाही किंवा एकत्र वेळ घालवू शकत नाही. अशा मुळे नात्यात दुरावा येतो.
5 आदराचा अभाव- प्रत्येकजण आदरास पात्र आहे. आपल्याला सन्मान मिळावा अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते पण कधी कधी आपण एकमेकांना आदर देण्यात मागे पडतो.आणि नकळत एकमेकांना दुखावतो .या मुळे नात्यात दुरावा येतो .
6) इतर लोकांचा हस्तक्षेप- अनेकदा वैवाहिक जीवन खराब होते जेव्हा कोणी त्यात तिसरा भाग घेऊ लागतो. हे लोक कोणीही असू शकतात, आपले नातेवाईक, मित्र किंवा आसपास राहणारे लोक देखील असू शकतात. ते आपल्याला नको ते सल्ले देतात आणि आपल्याशी एकनिष्ठ असल्याप्रमाणे वागतात. पण हे लक्षात असू द्यावे की हेच लोक आपल्या मधील नाते खराब करतात. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांशीआपल्या दोघांच्या नात्या संबंधांवर चर्चा करण्याऐवजी समुपदेशकाला भेटा.