Relationship Tips: नवीन प्रियकराला हे 6 प्रश्न विचारू नका त्यामुळे ब्रेकअप होऊ शकते
कोणत्याही नात्याचा धागा फार नाजूक असतो. अनेकदा नात्यातील छोट्या-छोट्या गोष्टींमुळे जोडीदाराला वाईट वाटते आणि नाते बिघडते. काळासोबत नातं घट्ट होत जातं, पण नवीन नातं सुरू व्हायचं असेल तर जास्त काळजी घ्यावी लागते.
अनेकदा मुलींसोबत असे घडते की त्या आपल्या नवीन बॉयफ्रेंडला समजून घेण्यासाठी घाई करतात. त्यांच्या अशा वागण्याने मुलं चिडू शकतात. आपण देखील नवीन बॉयफ्रेंड बनवला असेल तर त्याला काही प्रश्न विचारण्याची चूक अजिबात करू नका. आपल्या नात्यात दुरावा येऊ शकतो.
1 प्रियकराचा पगार विचारणे-नवीन नाते संबंधात प्रवेश करण्यापूर्वी आपल्या जोडीदाराबद्दल काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे, जसे की आपला प्रियकर काय करतो, तो कुठे काम करतो, परंतु नवीन प्रियकराला त्याचा पगार विचारणे खूप घाईचे असू शकते. यासाठी योग्य वेळेची वाट पहावी. रिलेशनशिपच्या अगदी सुरुवातीलाच जर आपण त्याला त्याच्या पगाराबद्दल विचारले तर प्रियकरासमोर आपली इमेज खराब होऊ शकते. त्यांना वाटेल की आपल्याला त्यांचा पैसा महत्त्वाचा आहे. अशामुळे संबंध बिघडू शकतात.
2 जुन्या नात्याबद्दल बोलणे -कधीकधी मुलींना त्यांच्या प्रियकराच्या जुन्या मैत्रिणींबद्दल जाणून घ्यायचे असते, परंतु नातेसंबंधाच्या अगदी सुरुवातीलाच त्यांच्या माजी मैत्री बद्दल प्रश्न विचारणे चुकीचे ठरेल . माजी व्यक्तीबद्दल अधिक प्रश्न विचारल्याने किंवा त्यांचे फोटो दाखवण्याचा आग्रह केल्याने प्रियकर नाराज होऊ शकतो.
3 भेटवस्तू मागणे -अनेक वेळा मुली आपल्या बॉयफ्रेंडला योग्य समजतात आणि त्यांच्याकडून भेटवस्तू किंवा महागड्या पार्टीची मागणी करतात. पण रिलेशनशिपच्या सुरुवातीच्या टप्प्यात आपल्या पार्टनरला हे अजिबात आवडत नाही. असं केल्याने त्यांच्या समोर आपली प्रतिमा खराब होऊ शकते.
4 निंदा करणे- जर प्रियकराशी नवीन नाते निर्माण झाले तर कोणाची ही निंदा करणे टाळा. विशेषत: आपण स्वतःबद्दल किंवा त्यांच्या मित्रांबद्दल आणि कुटुंबाबद्दल निंदा केले असल्यास, त्यांना ते अजिबात आवडत नाही.
5 मित्रांबद्दल प्रश्न विचारू नका- आपल्या प्रियकराला त्याच्या मित्रांबद्दल किंवा इतर मुलांबद्दल प्रश्न विचारू नका. यामुळे तुमच्या प्रियकराला असे वाटू शकते की आपण त्याच्या एखाद्या मित्रामध्ये जास्त रस घेत आहात. त्यामुळे त्याला दुराग्रह ही होऊ शकतो. नातं नवीन असेल तर विश्वासही कमकुवत होतो, अशा प्रश्नामुळे प्रियकराचा आपल्या वरील विश्वास कमी होऊ शकतो.
6 घरगुती गोष्टी करणे- अनेकदा मुलींना त्यांच्या प्रियकराच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायचे असते, परंतु नातेसंबंधाच्या सुरुवातीच्या काळात प्रियकराला घरगुती गोष्टींबद्दल विचारू नका. जोपर्यंत त्याला स्वतःच्या कुटुंबाबद्दल आणि घराबद्दल सांगणे सोयीचे वाटत नाही तोपर्यंत त्याच्याकडून जाणून घेण्याचा आग्रह धरू नका.