शुक्रवार, 2 डिसेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified शनिवार, 19 मार्च 2022 (13:44 IST)

Relationship Tips: प्रत्येक जोडप्याने सकाळी उठल्याबरोबर या चार गोष्टी कराव्यात, नात्यातील प्रेम कधीच कमी होणार नाही

आजच्या धकाधकीच्या जीवनशैली आणि कामामुळे आता लोकांकडे एकमेकांसाठी कमी वेळ आहे. इतर नातेसंबंधांमध्ये याकडे एकदा दुर्लक्ष केले जाऊ शकते, परंतु पती -पत्नीच्या नात्यात असं केल्यामुळे जोडप्यांमधील अंतर वाढू शकते. कामामुळे जोडीदाराला वेळ देता येत नसेल तर आपापसात भांडण होतात आणि नात्यात दुरावा येण्याची शक्यता वाढते. नातं बळकट करण्यासाठी आणि प्रेम टिकवण्यासाठी प्रत्येक जोडप्याने सकाळी या चार गोष्टी कराव्यात.
 
1 सकाळी गोड हसणे- आपल्या दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी, जोडप्याने सकाळी उठल्याबरोबर एकमेकांना सकाळच्या शुभेच्छा देण्याची सवय लावली पाहिजे. जेव्हा आपला जोडीदार उठल्याबरोबर आपल्याकडे बघून हसतो आणि दिवसाच्या सुंदर शुभेच्छा देतो, तेव्हा आपल्यालाही बरे वाटेल आणि संपूर्ण दिवस फ्रेश मूडमध्ये जाईल. म्हणून रोज सकाळी एकमेकांना हसतमुखाने प्रेमाने शुभेच्छा द्या.
 
2 एकत्र नाश्ता करा- कदाचित कामाच्या व्यस्तते मुळे आपण आपल्या जोडीदाराशी दिवसभर नीट बोलू शकत नाही आणि संध्याकाळी कामाच्या थकव्यामुळे त्यांच्याशी नीट बोलू शकत नाही. असेही होऊ शकते की कामाच्या व्यस्ततेमुळे आपण  दोघांना दुपारचे आणि रात्रीचे जेवण एकत्र घेणे शक्य नाही, परंतु सकाळचा नाश्ता आपल्याला नेहमी एकमेकांच्या जवळ ठेवेल. जर आपला जोडीदार नेहमी सकाळचा नाश्ता बनवत असेल तर काही वेळा आपण सकाळचा चहा किंवा कॉफी करून त्यांना सरप्राईज देऊ शकता. स्वयंपाकघरात एकत्र उभे राहून आपण नाश्ता तयार करताना  थोडा वेळ एकत्र घालवू शकता. एकत्र घालवलेला थोडा वेळ देखील जोडप्यामधील प्रेम कमी होऊ देत नाही.
 
3 आपल्या जोडीदाराची स्तुती करा- प्रत्येक व्यक्तीला त्याची स्तुती ऐकून आनंद होतो. दुसरीकडे, जर आपल्या जोडीदाराने आपली प्रशंसा केली तर प्रेम अधिक वाढते. आपण देखील आपल्या जोडीदाराची वेळोवेळी प्रशंसा केली पाहिजे. अशा परिस्थितीत, त्यांना असे वाटेल की आपण कितीही व्यस्त असलात तरी ही त्यांच्याकडे लक्ष देता. त्यांच्या दिसण्याव्यतिरिक्त, आपण त्यांच्या कामाची, व्यक्तिमत्त्वाची, कोणत्याही गोष्टीची प्रशंसा करू शकता. कौतुक केल्याने त्यांच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल  आणि जर आपल्या जोडीदाराचा मूड चांगला असेल तर त्याचा प्रभाव आपल्या  मूडवरही चांगला होतो.
 
4 सकाळची सुरुवात हसून करा- जर आपली सकाळ चांगला मूडमध्ये असेल तर आपला आणि आपल्या जोडीदाराचा दिवस चांगला जाईल. त्यामुळे रात्रीच्या चांगल्या झोपेनेचे भूतकाळातील गोष्टी विसरून नवीन सकाळची सुरुवात मजेशीर विनोदाने करा. एकमेकांना आनंद देण्यासाठी किंवा हसण्यासाठी विनोद सांगा. यामुळे आपल्या  पार्टनरचा मूड चांगला राहतो. तो कामाचा ताण किंवा इतर तणावातून बाहेर पडतो आणि आपल्याशीही चांगला वागतो.