सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 मार्च 2022 (22:28 IST)

नात्याला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी नेहमी या गोष्टीं अवलंबवा

आपण बऱ्याचवेळा असे ऐकले असेल की प्रेमाला कोणाची दृष्ट लागली आहे. जरी या सर्व गोष्टी विश्वास करण्यासारख्या नसल्या तरी ही जेव्हा प्रेमाबद्दल बोलायचे झाले तर व्यक्ती या गोष्टींवर विश्वास ठेऊ लागतो. आणि आपल्या नात्याला वाचविण्यासाठी काहीही करण्यासाठी तत्पर असतो. आपल्या नात्याला कोणाची दृष्ट लागू नये असं वाटत असल्यास या काही गोष्टी लक्षात ठेवा आणि अवलंबवा. जेणे करून आपल्या प्रेमाला आणि नात्याला कोणाचीही दृष्ट लागू नये. 
 
1 सोशल मीडियावर प्लांट करू नका - सोशल मीडियावर एक्टिव्ह राहणे काळाची गरज असू शकते. पण नेहमी सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडीओ सामायिक करू नका. असं केल्याने देखील आपल्या नात्याला दृष्ट लागू शकते. 
 
2 सार्वजनिक ठिकाणी काळजी घ्या -सार्वजनिक ठिकाणी अति उत्साह दाखवू नका. असं केल्याने आपली टिंगल होऊ शकते. एवढेच नाही तर असं केल्याने आपल्या नात्याला दृष्ट लागू शकते. 
 
3 आपले सिक्रेट शेअर करू नये- आपल्या खाजगी गोष्टी कोणाशीही सामायिक करू नये. विशेषतः आपले आपल्या पार्टनर सह घालविले एकांताचे क्षण. या गोष्टी सामायिक करू नये. 
 
4 जोडीदाराला मोकळीक  द्या- आपल्या नात्याला दृढ करण्यासाठी आपल्या जोडीदाराला मोकळीक द्या. नेहमी एकत्र फिरण्याने देखील नात्याला दृष्ट लागू शकते.