शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: मंगळवार, 8 मार्च 2022 (20:49 IST)

Relationship Tips : नातं दृढ करण्यासाठी नवविवाहित जोडप्याने या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी

दोन लोक वैवाहिक बंधनात अडकल्यावर त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात होते. वैवाहिक जीवन आनंदी करण्यासाठी, लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले असणे देखील आवश्यक आहे. लग्नानंतर नवविवाहित पती-पत्नीने एकमेकांना समजून घ्यावे लागते. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात जर त्यांच्यात एकमेकांबद्दल चे मत चांगले असतील तर आयुष्यातील येणारे दिवस सोपे वाटू लागतात. तर , नवीन लग्नानंतर काही चुकीचे घडले, तर ते आयुष्यभर मनात राहते . म्हणूनच नवविवाहित जोडप्यासाठी हे आवश्यक आहे की त्यांच्या लग्नानंतरच्या आयुष्यात सर्व काही चांगले आणि सुरळीत असावे जेणे करून त्यांचे नातं दृढ होईल. त्यांच्या मधील नातं दृढ राहण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 एकमेकांशी मोकळेपणाने संवाद करा- कोणत्याही नात्यात दुरावा येणाचे कारण म्हणजे संवाद न करणे आहे. दोन लोक जेव्हा लग्नाच्या बेडीत बांधले जातात कदाचित ते एकमेकांना नीट ओळखत नसतील. कारण अरेंज मॅरीज मध्ये नवीन जोडपे एकमेकांना नीट ओळखत नाही. म्हणून दोघांना एकमेकांशी मनमोकळा संवाद करणे गरजेचे आहे. जेणे करून ते एकमेकांच्या आवडी-निवडी समजू शकतात. आपल्या भावना एकमेकांशी शेअर केल्याने गैरसमज देखील नाहीसे होतात.
 
 2 अधिक निर्बंध घालू नका-लग्नापूर्वी, मुलगा आणि मुलगी त्यांचे इच्छित जीवन जगतात. पण लग्नानंतर दोघांचेही आयुष्य बदलून जाते. अशा परिस्थितीत, त्यांना नवीन जीवनाशी जुळवून घेण्यासाठी संधी आणि वेळ हवा असतो. दरम्यान, एकमेकांना मोकळीक द्यावी. जोडीदारावर कोणतेही निर्बंध लावू नका. असे केल्याने पार्टनर आपल्यापासून दूर जाऊ शकतो. त्यांच्या व्यवहारात चुकीचे वाटत असेल किंवा त्यांना एखादे काम करण्यापासून रोखायचे असेल तर त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करा.
 
3 जुळवून घेण्यासाठी वेळ द्या-नवीन लग्न झाल्यावर जोडीदाराला एकमेकांशी जुळवून घेण्यात अडचण येऊ शकते. एकमेकांसोबत राहण्यासाठी किंवा त्यांना समजून घेण्यासाठीही वेळ लागू शकतो. दरम्यान, आपल्या पार्टनरनी आपल्या मतानुसार वागावे अशी अपेक्षा करू नये. या नवीन नात्याशी जुळवून घेण्यासाठी त्यांना योग्य वेळ द्या. असं केल्याने दोघांमध्ये चांगला समज निर्माण होईल.
 
4 स्वतः एडजेस्ट करायला शिका- सुखी वैवाहिक जीवनासाठी आपल्याला जोडीदाराकडून काही अपेक्षा असतील तर त्यांच्या अपेक्षाही पूर्ण करणे आवश्यक आहे. नात्यात दोघांनाही जुळवून घ्यावं लागतं. म्हणून, जर आपण त्यांना जुळवून घेण्यासाठी वेळ देत असाल तर स्वत: देखील एडजेस्ट करायला शिका.  जोडीदारासाठी लग्नाचे नातं सोप करण्याचा प्रयत्न करा. त्यांना मोकळीक द्या. एकमेकांशी  त्यांच्या वेळेनुसार बोला. जेणेकरून ते आपल्याशी  मनापासून बोलतील. आणि आपले नातं अधिक दृढ होईल.