मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (15:04 IST)

लग्नानंतर मुलींसमोर येतात या समस्या, अशा प्रकारे सोडवा

लग्न हे दोन भिन्न विचारांच्या, स्वभावाच्या लोकांमधील असे नाते आहे, जे जोडल्यानंतर दोन भिन्न व्यक्तिमत्व असूनही त्यांना एक बनवते.जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी लग्न करतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात विशेषत: मुलींच्या आयुष्यात मोठा बदल घडतो. भारतीय कुटुंबांमध्ये लग्न होताच मुलींना आपले कुटुंब, आई-वडिलांचे घर सोडून पती आणि सासू-सासऱ्यांसोबत राहावे लागते. त्यानंतर अनेक बदल, आव्हानांचा सामना प्रत्येक नवविवाहित जोडप्याला करावा लागतो. तिने आपल्या जीवनातील या बदलांशी जुळवून घेतले किंवा लग्नानंतर येणाऱ्या आव्हानांना तोंड दिले तर त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी होऊ शकते. मात्र, यासाठी मुलींनी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अगोदरच तयार राहायला हवे.
 
लग्नानंतर मुलींच्या आयुष्यात काय बदल होतात, काय समस्या येऊ शकतात आणि त्यावर उपाय काय आहे चला तर जाणून घेऊ या  
 
1 नवीन सुनेपासून अपेक्षा -मुलगी जेव्हा लग्न करून  नवऱ्याच्या घरी जाते तेव्हा तिचे नाते फक्त तिच्या आयुष्याच्या जोडीदाराशीच नाही तर तिच्या सासरच्या माणसाशीही जोडले जाते. मुलीच्या सासूला तिच्या नवीन सुनेकडून काही अपेक्षा असतात. तर सासरी येणाऱ्या दीर आणि नणंदेला आपल्या नव्या वहिनी कडूनही काही अपेक्षा असतात. सुरुवातीला या सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात . आपल्याला आवडीच्या नसलेल्या काही गोष्टीही मुलींना कराव्या लागतील. सून म्हणून आपल्यावर अनेक जबाबदाऱ्या असू शकतात.
 
2 पतीशी जुळवून घेणे -जर आपले अरेंज मॅरेज झाले असेल तर नवीन पतीशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या आवडी निवडी जाणून घेण्यासाठी वेळ लागतो. आपल्या दोघांचे व्यक्तिमत्त्व आणि आवडीनिवडी जुळत नसतील, तरीही आपल्याला त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल. 
 
3 कामासोबत वैयक्तिक आयुष्याचा समतोल साधणे-जर आपण लग्नापूर्वी काम करत असाल तर घरात जुळवून घेण्याची गरज नसते. घरात आई संपूर्ण कुटुंबाची काळजी घेते. पण लग्नानंतर आपल्याला कामासोबतच वैयक्तिक आयुष्याचा समतोल साधावा लागेल. नोकरीबरोबर कुटुंबाची काळजी घेणे, घरातील कामे करणे, सासू-सासऱ्यांची काळजी घेणे इत्यादी कामे करावी लागतात. यासाठी या सर्व गोष्टी कशा करायच्या हे आधीच ठरवा. 
 
4 मोकळेपणा मिळत नाही -लग्नानंतर नवविवाहित जोडप्याला एकटे राहण्याची संधी मिळणार नाही. त्याची वैयक्तिक जागा कमी होते. आजूबाजूला लोक आहेत. जर आपल्याला स्वतःसाठी थोडा वेळ काढायचा असेल, तर तेही कठीण होऊ शकते. यासाठी आपण मानसिकदृष्ट्या तयार असले पाहिजे.