शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Updated : मंगळवार, 31 मे 2022 (16:21 IST)

Relationship Tips : सासू-सुनेच्या नात्यात गोडवा येईल, या गोष्टी लक्षात ठेवा

mother
लग्नानंतर मुलगी आई-वडिलांचे घर सोडून सासरच्या घरी येते. येथे ती नवीन नात्यात गुंतते. मुलीचे नाते केवळ तिच्या पतीशीच नाही तर पतीच्या आई-वडिलांशीही जोडलेले असते. पत्नी होण्यासोबतच स्त्री ही सूनही बनते. मुलीला तिच्या सासू-सासऱ्यांशी जसं नातं तिच्या आई-वडिलांशी असतं तसंच ठेवावं लागतं.आणि सासूला देखील सुनेला आपल्या लेकीप्रमाणे वागवावं लागत.
 
जुन्या काळी प्रेमापेक्षा सासू-सून यांच्यात जास्त भांडणे आणि वाद व्हायचे, पण आता सासू-सून यांच्यातील संबंध पहिल्या सारखे राहिलेले नाहीत. आजकाल सासू आणि सून यांच्यात समजूतदारपणा आणि गोडवा दिसून येतो.
 
सासू आणि सून यांच्यातील गोड आणि घट्ट नाते हवे असल्यास या गोष्टी अवलंबवा आणि लक्षात ठेवा.
 
* सासू सुने मध्ये वादाचे कारण- मुलींचे लग्नानंतर आयुष्यच बदलून जाते. त्याच्यासाठी सासरी नवीन वातावरण असते. सासू आपल्या सुनेला सासरच्या रीती-भाती, पद्धती सांगतात. सुनेने आपल्या कुटुंबाच्या शैलीशी स्वत:ला जुळवून घ्यावे असे सासूला वाटते, तर सुनेला वाटते की सासूला तिच्या जीवनशैलीत बदल घडवून आणायचा आहे. यावरून दोघांमध्ये भांडण होतात. 
 
* आवड-निवड समजून घ्या -सासू आणि सुनेला एकमेकींच्या आवड-निवड समजून घेतले पाहिजे. आपल्या आवडी निवडी त्यांच्यावर लादू नये. त्यांच्या आवडी निवडी जोपासावे. 
 
* एकमेकांसह वेळ घालवा- मुलगी लग्न करून सासरी आल्यावर सासूला तिचा स्वभावाची कल्पना नसते. आणि सासूच्या स्वभावाबद्दल सुनेला देखील माहिती नसत. अशा परिस्थितीत त्यांनी एकमेकांसह वेळ घालवावा. जेणे करून त्यांना एकमेकांचा स्वभाव समजू शकेल. 
 
* बदल करण्याचा दबाब आणू नका- जेव्हा दोन व्यक्ती सोबत राहतात तेव्हा त्यांना अपेक्षा असते की समोरच्याने त्यांच्या आवडीनुसार स्वतःत बदल घडवून आणला पाहिजे. सासू-सुना देखील एकमेकींकडून अशी अपेक्षा ठेवतात. असं करू नका. एकमेकींना बदलायचा प्रयत्न करू नका. अशा मुळे दोघांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता असते. 
 
* आई-लेकी प्रमाणे वागा- सासूला आपल्या सुनेला आपल्या लेकीप्रमाणेच प्रेम आणि आदर दिला पाहिजे. आणि लग्नानंतर सुनेने देखील आपल्या सासूशी आपल्या आईप्रमाणे प्रेम आणि आदर दिला पाहिजे. असं केल्याने सासू सुनेच्या नात्यात गोडवा येतो.