बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (22:15 IST)

Relationship Tips :किशोरवयीन मुलांची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा

किशोरवयीन मुलांची काळजी घेणे आणि त्यांना समजून घेणं  हे मोठे आव्हान आहे. लहान वयात वाढणार्‍या मुलांच्या स्वभावात बरेच बदल होत असतात, ते समजून घेऊन काही मूलभूत गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
 
* मुलांचे ऐका - या वयात, मुलांना त्यांच्या समस्या काळजीपूर्वक ऐकणाऱ्या व्यक्तीची गरज असते. यासाठी मुलांचे मित्र बनून त्यांचा विश्वास जिंकणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रत्येक गोष्टीवर लेक्चर देऊ नका, या वयात मुलांना सारखे सारखे टोमणे मारू नका. तसेच त्यांच्याकडून चूक झाल्यास त्यांना भविष्यासाठी आशा द्या. प्रत्येक चुकीवर त्यांना व्याख्यान देऊ नका. यामुळे मुले तुमच्यापासून दूर होतील.
 
* मुलांचे आकर्षण आणि प्रेम यातील फरक समजून घ्या -मुलाचे एखाद्यासाठी आकर्षण असल्यास त्याच्यावर रागवू नका.  त्यांना समजून घ्या. या वयात त्यांना आकर्षण आणि प्रेमामधील अंतर समजू लागेल.  
 
* लहान मुलांप्रमाणे व्यवहार करू नका-वयात येणारे मूल स्वतःला त्याच्या वयाच्या आधी मोठे झालेले समजू लागते आणि अशा परिस्थितीत जर आपण त्याला लहान मुलासारखे वागवले तर त्याचा राग त्याला येऊ शकतो.
 
* मुलांचे अपयश स्वीकारा- आजच्या काळात प्रत्येक पालक त्यांना यशाचा मंत्र सांगतो, पण अपयशाला सामोरे जायला शिकवत नाही. अशा परिस्थितीत जेव्हा मुले हरतात तेव्हा ते त्याला  मोठी समस्या मानून ते निराश होतात.