1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जानेवारी 2022 (20:44 IST)

Love RelationshipTips :जोडीदाराला भेटल्यावर भांडण होऊ नये, या साठी या टिप्स अवलंबवा

कधीकधी असे होते की जेव्हा तुम्ही जोडीदारासोबत असता तेव्हा त्या सुंदर क्षणांना अनुभवत नाही , पण जेव्हा तुम्ही दूर असता तेव्हा दूर असतो तेव्हा जोडीदाराशी झालेल्या प्रयेक लहानमोठ्या भांडणांना मुकतो आणि  पश्चाताप होऊ लागतो. अशा परिस्थितीत  जोडीदाराला जास्त मिस करू लागतो. आपल्यासह ही असे होत असेल तर काही गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.जेणे करून जोडीदाराशी भेटल्यावर भांडण होऊ नये. 
 
1 रागात कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका- काहीवेळा, अचानक,काही गोष्टी वाईट वाटू लागतात. त्याचा राग येऊ लागतो. अशा परिस्थितीत, जेव्हा जेव्हा  राग येईलतेव्हा गप्प बसा किंवा काहीतरी वेगळे बोलायला सुरुवात करा. 
 
2 बसून समस्या सोडवा- एखाद्या विषयावर आपली मते भिन्न भिन्न असू शकतात, एखाद्या गोष्टीवर आपली मते वेगळी असतील तर भांडण न करता बसून तोडगा काढावा. 
 
3 जोडीदारासोबत फिरायला जा- कधीकधी जोडीदारासोबत फिरायला जाणे हे फॅन्सी डिनर किंवा डेटपेक्षा खूप चांगले असते. काही वेळा अशा गोष्टी घडतात, ज्यामुळे समजूतदारीने वागणे चांगले असते. 
 
4 प्रत्येक क्षण आनंदाने जगा- आपण आपल्या  जोडीदारासोबत थोडा किंवा जास्त वेळ घालवता, पण जेवढा ही वेळ आपण त्यांच्यासोबत राहता तो क्षण मोकळेपणाने जगा. सर्व समस्या विसरून त्या वेळेचा आनंद घ्यावा. 
 
5 चहावर गप्पा करा -आनंदी बोलण्याने पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते. अशा परिस्थितीत जर आपण जोडीदाराशी भांडण न करता बोललात, तर जोडीदार नसल्यावर आपल्याला कमी दुःख होईल.