सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (17:14 IST)

Relationship Tips सुखी वैवाहिक जीवनामागील रहस्य या शब्दांमध्ये दडलेले आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

सुखी वैवाहिक जीवनामागील रहस्य या शब्दांमध्ये दडलेले आहे हे तुम्हाला माहीत आहे का? 
 
चुप राहून आनंदी राहणे
असे म्हणतात की जास्त बोलण्यामुळे कटीकटी होतात अशात अनेकदा चुप राहून वाद टाळता येऊ शकतो.
 
अनेकवेळा पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला की ते वाद घालण्याऐवजी गप्प राहणे पसंत करतात आणि बहुतेक वेळा पत्नीच्या होकाराने भांडण होण्याची शक्यता नाहीशी होते. तुम्हीही याच्याशी सहमत व्हाल.
 
मान हालवणे अर्थात हो मध्ये हो म्हणायला शिकणे
जेव्हा पत्नीला एखाद्या गोष्टीवर राग येतो आणि ती भांडू लागते, तेव्हा बहुतेक प्रकरणांमध्ये पती प्रथम आपले मत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. पुढे, जेव्हा त्यांना वाटते की यामुळे प्रकरण संपणार नाही आणि परिस्थिती आणखी बिकट होईल, तेव्हा ते स्वतःला त्या परिस्थितीत अडकण्यापासून वाचवण्यासाठी मौन बाळगतात. ते शक्य तितक्या लवकर होकार देत भांडण संपवण्याचा प्रयत्न करतात. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून हो मध्ये हो म्हणणे कधीही चांगले.