मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जुलै 2021 (14:27 IST)

आषाढी एकादशीला पंढरपुरात शुकशुकाट

यंदाच्या वर्षी कोरोनाच सावट असल्यामुळे दरवर्षी पंढरपुरात संतांचा मेळावा जमा असतो.भक्तांचा महापूर दिसतो. वारकरी टाळ-मृदूंग घेऊन पंढरीची वारी करतात.परंतु यंदाच्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परवानगी नसल्यामुळे चंद्रभागेच्या काठावर शुकशुकाट आहे.
 
कोरोनामुळे दरवर्षी चंद्रभागेच्या काठी येणारे आणि तिरावर स्नान करणारे भक्त नाहीत.हा भक्तांचा महापूर कोरोनामुळे जणू आटला आहे.कोरोनाचे वाईट सावट या एकादशी वर पडले आहेत.दरवर्षी मैलांचा प्रवास करून वारकरी पंढरपूर विठू माऊलीच्या दर्शनास येतात.त्यांच्या साठी आपत्ती व्यवस्थापन समिती कडून चांगली सेवा दिली जाते.परंतु यंदाच्या वर्षी असे काहीच घडले नाही.त्यामुळे पंढरपूर आणि चंद्रभागेचा काठ सुना दिसत आहे. 
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा सपत्नीक केली.त्यांनी राज्यात सौख्य,आरोग्य,संपन्नता नांदू दे, तसेच कोरोनाचा लवकरच नायनाट होऊ दे अशी साकडे विठ्ठलाला घातली.