- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - स्त्री-पुरुष
न्हावी
बर्याच दिवसानंतर तीन मैत्रिणीं एकत्र जमल्या होत्या. त्या तिघीही आपापल्या पतीच्या बढाई मारत होत्या. पहिली- अगं माझे मिस्टर शिक्षक आहेत. त्यांच्या पुढे तर सगळ्या विद्यार्थ्यांच्या माना झुकतात.दुसरी- माझे मिस्टर हेडमास्टर आहेत. त्यांच्या पुढे तुझ्या मिस्टरांसारख्या शिक्षकांच्या माना झुकतात. तिसरी- अंग माझ्या मिस्टरांपुढे तुमच्या दोघींचे मिस्टर माना झुकवतात. दोघीही- कोण आहेत ग तुझे पती? तिसरी- न्हावी !