शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. नरेंद्र मोदी
Written By
Last Modified: मंगळवार, 25 सप्टेंबर 2018 (17:26 IST)

मोदी यांचे नाव नोबल पुरस्कारासाठी सुचवले

तामिळनाडूमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष डॉ. तमिलीसाई सुंदरराजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाव नोबल पुरस्कारासाठी सुचवण्यात आलंय. पंतप्रधान मोदी यांनी आयुष्मान भारत योजनेच्या रुपात जगातील सर्वात मोठ्या स्वास्थ्य योजनेची सुरुवात केलीय.  यासाठी त्यांना नोबल शांती पुरस्कार मिळायला हवा, असा उल्लेख या नॉमिनेशनमध्ये करण्यात आलाय. हे नॉमिनेशन सुंदरराजन यांच्या पतीनं केलंय. ते एका खाजगी युनिव्हर्सिटीत नेफ्रॉलॉजी विभागाचे प्रमुख आहेत. 
 
काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात जन्मलेल्या मुलांना भाजपच्या तामिळनाडू गटानं सोन्याच्या अंगठ्या वाटल्या होत्या. पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष टी सुंदरराजन यांनी मध्य चेन्नईच्या पुरासैवक्कमस्थित सरकारी पीएचसीमध्ये नवजात बालकांना सोन्याच्या अंगठ्या भेट दिल्या होत्या.