गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. नरेंद्र मोदी
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (08:29 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 71वा वाढदिवस ! भाजपचे 20 दिवसीय राष्ट्रव्यापी अभियान

मोदींचा वाढदिवस भव्य पद्धतीनं साजरा करण्यासाठी भजपनं कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं चा आज 71वा वाढदिवस.
यानिमित्तानं भाजपकडून भव्यदिव्य तयारी करण्यात आली आहे. भाजपनं 20 दिवसांच्या राष्ट्रव्यापी अभियानाची योजना आखली आहे.
या अभियानाला आजपासून सुरुवात केली जाणार असून 7 ऑक्टोबर रोजी याची सांगता होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अभियानाला सेवा आणि समर्पणाचं नाव देण्यात आलं आहे.
दरम्यान, 20 दिवसांचं अभियान राबवण्यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे, 20 दिवसांनी म्हणजेच, 7 ऑक्टोबर रोजी 20 वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.
याच पार्श्वभूमीवर भाजपनं हे अभियान 7 ऑक्टोबरपर्यंत सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच भाजपनं यासाठी चार सदस्यीय समिती तयार केली आहे.
ही समिती पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. दरम्यान, या समितीचं नेतृत्त्व कैलाश विजयवर्गीय करत आहेत.
असं सांगितलं जात आहे की, रक्तदान शिबिर, मोदींच्या जीवनावरील प्रदर्शन यांसारखे कार्यक्रम या अभियानातंर्गत आयोजित करण्यात येणार आहेत.
त्यासोबतच पक्षाच्या सर्व कार्यालयांमधून लाखोंच्या संख्येनं मोदींना पोस्टकार्ड पाठवण्यात येणार आहेत.