बुधवार, 29 नोव्हेंबर 2023
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: शनिवार, 15 जुलै 2023 (12:04 IST)

Chandrayaan-3 एक यशस्वी झेप अवकाशात

chandrayaan 3
एक यशस्वी झेप अवकाशात,
आणि एक माना चा तुरा, शिरपेचात,
चन्द्रयान झेपावले गगनी, काय तो सोहळा,
रोमांच उभे अंगावर,स्तुतीसुमने येती गळा,
प्रयत्नांची पराकाष्ठा, फळास आली,
कक्षा रुंदावल्या आता, यशश्री पदरात पडली,
शास्त्रज्ञ , आणि सर्वच जणांचे कौतुक,
आणिही प्रगती बघण्यास, आम्हीं ही उत्सुक!
...अश्विनी थत्ते.