सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जुलै 2023 (16:28 IST)

Chandrayaan-3 : भारत चंद्रावर इतिहास रचणार, चांद्रयान-3 चे 14 जुलै रोजी प्रक्षेपण

chandrayaan 3
चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणाची उलटी गिनती सुरू झाली आहे. 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता भारत अवकाशात नवा इतिहास रचणार आहे. चांद्रयान-3 दुपारी 2.35 वाजता भारताच्या आशा घेऊन उड्डाण करेल. चांद्रयान-3 SDSC श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले जाईल. जर चांद्रयान-३ चे लँडर चंद्रावर उतरण्यात यशस्वी झाले तर भारत असे करणारा चौथा देश ठरेल. याआधी अमेरिका, रशिया आणि चीनने आपले अंतराळ यान चंद्रावर उतरवले आहे.
 
चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. चांद्रयान-3 चांद्र मोहिमेच्या प्रक्षेपणाचा एक भाग म्हणून, त्याचे एन्कॅप्स्युलेटेड असेंब्ली त्याच्या प्रक्षेपण वाहनाला 5 जुलै रोजी जोडण्यात आले आहे. लॉन्च व्हेईकल मार्क-III ISRO ने विकसित केले आहे. हे तीन-चरण मध्यम-लिफ्ट लॉन्च वाहन आहे.