बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: तेलंगणा , शुक्रवार, 7 जुलै 2023 (14:24 IST)

चालत्या ट्रेनच्या तीन डब्यांना भीषण आग, प्रवाशांमध्ये घबराट, पाहा VIDEO

train fire
ANI
Fire in train coaches पश्चिम बंगालहून सिकंदराबादला जाणाऱ्या फलकनुमा एक्स्प्रेस ट्रेनला शुक्रवारी आग लागली. आगीनंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली. काही वेळातच आग इतकी भीषण झाली की ट्रेनचे तीन डबे जळून खाक झाले. मात्र, या अपघातात कोणालाही जीव गमवावा लागला नाही. सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
येथे लागल‍ी आग
रेल्वेच्या सीपीआरओने सांगितले की, फलकनुमा एक्सप्रेस पश्चिम बंगालहून सिकंदराबादला निघाली होती. शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता तेलंगणातील नलगोंडाजवळील पगडीपल्ली येथे ट्रेनला आग लागली. काही वेळातच आग तीन डब्यांमध्ये पसरली. आगीत एस 4, एस 5 आणि एस 6 हे डबे जळून खाक झाले. आग लागल्यानंतर प्रवाशांना तात्काळ खाली उतरवण्यात आले. आता त्यांना दुसऱ्या ट्रेनने पाठवले जात आहे.
 
अजून कारण माहित नाही
ट्रेनला आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. रेल्वेने तपास सुरू केला आहे. या अपघातात कोणालाही जीव गमवावा लागला नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले. अपघाताचे व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये रेल्वेच्या बोगी आगीच्या ज्वाळांमध्ये जळताना दिसत आहेत.