रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 जून 2023 (18:05 IST)

तेलंगणा : बॅडमिंटन खेळताना तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू

death
तेलंगणा मध्ये बॅडमिंटन खेळत असताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. बुसा व्यंकट राजा गंगाराम असे या मयत तरुणाचे नाव आहे. 
 
मयत बुसा व्यंकट राजा गंगाराम हा तरुण शुक्रवारी सकाळी आपल्या मित्रांसह राज्यातील जगित्याला जिल्ह्यातील एका क्लब मध्ये फिरायला आला होता तिथे त्यांनी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली.बुसा नेहमी बॅडमिंटन खेळायचा मात्र हे त्याचा आयुष्यातील शेवटचे खेळणे ठरले. खेळत असताना तो एकाएकी थरथरायला लागतो आणि कोणाला काही समजेल तो अचानक खाली कोसळतो.तातडीने सर्व मित्र त्याला श्वास देण्याचा प्रयत्न करतात परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.त्याच्या मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं त्यांनी सांगितले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit