अंधारावर आहे साम्राज्य प्रकाशाच!
अंधारावर आहे साम्राज्य प्रकाशाच!
दिवस आले उत्साहाचे ,पर्व उत्सवाचं,
करा मन ही लख्ख, घासून पुसून,
शिरू द्या प्रकाश, आत भरभरून,
उजळू द्या चहु दिशा, न्हाऊ प्रकाश पर्वात,
लावू शेकडो दिवे, उजळून टाकू यात,
नको राग, नको लोभ, मनी केवळ आनंद,
देऊ घेऊ परस्परांत केवळ परमानंद!
व्हा तुम्ही ही सारे, यावं माझ्यासवे,
मिलन आपलं दुग्ध शर्करा सम व्हावे!
...अश्विनी थत्ते