Festival Posters

Marathi Kavita झोपेचं न एक अजबगजब नाटक असतं

Updated: सोमवार, 9 ऑक्टोबर 2023 (15:06 IST)
नसते गरज तिची अजिबात, तेंव्हा काही केल्या थांबत नाही,
जांभया वर जांभया येतात, नकोस होतं,
तिला थांबवणं केवळ अशक्यच असतं,
कधी कधी आराधना करवी लागते निद्रादेवीची,
कड परतवून परतवून थकतो आपण, पण मात्रा लागू नसते कशाची,
परीक्षेच्या काळात येणारी झोपेच वर्णन ते काय करावं,
आयुष्यात पुन्हा येत नाही ती अशी, असंच समजावं,
असतात काही लोकं, जे पडल्या पडल्या निजतात,
काही मात्र अंथरुणावरून आढयाकडे बघत बसतात,
एखाद्या कार्यक्रमात जावं, थंड वातावरण असतं,
निद्रादेवीला तिथं अगदी यायचंच असतं,
डोळे जड होतात कधी ते कळत नाही,
कार्यक्रम कुठं चाललंय हे आपल्यास कळतही नाही,
प्रवासात बसल्या बसल्या कित्येक जण , कधी न झोपल्या परी झोपतात,
दुसऱ्याला त्याचा त्रास होतोय, हे ही विसरतात,
तर असं अजबगजब तंत्र या झोपेचं,
पण त्यावरचं अवलंबून असत, घड्याळ माणसाचं!!
..अश्विनी थत्ते.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

Happy Hartalika Tritiya Images Marathi हरतालिका तृतीया शुभेच्छा इमेजेस

गणेशोत्सवासाठी खास नैवेद्य: जिभेवर विरघळणारा केळी बेसन हलवा; Banana Besan Halwa

Happy Ganesh Chaturthi Wishes Images 2026 गणेश चतुर्थी शुभेच्छा फोटो

चिया बिया या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतात, कोणी खाऊ नये

मोबाईल अॅप डेव्हलपर कसे व्हावे? आवश्यक कौशल्ये, शिक्षण आणि करिअरच्या संधी जाणून घ्या

पुढील लेख
Show comments