सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (14:32 IST)

Marathi Kavita आयुष्याचा पसारा एवढा मोठा, की आवरता आवरेना

marathi poem
आयुष्याचा पसारा एवढा मोठा, की आवरता आवरेना,
स्वतःच विस्कटून जातो आपण, पण तो एकत्र होईना!
कधी न कसा हा पसारा वाढतो, कळतच नाही,
गुंततो आपण कशात ते कधी समजत नाही,
परिणामी काहीही करायला जा, तो वाढतच जातो,
पण मात्र नंतर तो आपणासच नकोसा वाटतो,
नातीगोती असोत की आणिक काही,
नाही म्हणायची आपली हिम्मत कधीच होत नाही,
पेलत नसतात कधी कधी , ते निभावणं,
पण कसोटी स्वतः ची लावून, आवश्यक असते  सर्व पार पडण,
स्वतः च्याच छांदिष्ट पणाचा नुसता राग राग येतो,
आयुष्याचा चांगला काळ मात्र त्यातच व्यतीत होतो,
थांबू या आता तरी, मनांतुन आलाय आवाज,
शांत विचार करून ठरवू अन मुक्त होऊन जाऊ आज.
..अश्विनी थत्ते.