श्रीमंत बालपण !!
ते टायर घेऊन काठीने पळवण,
कंचे खिश्यात भरून, मालामाल होणं,
विटी दांडू घेऊन, इकडे तिकडे मा रण
चिखलात सबलीने खुपसत,मैदान भर फिरणं,
बाहीला तोंड पुसत, पतंग उडवण,
हातात भोवरा घेऊन, गर्रकन फिरावंण,
गेले ते दिवस,आता त्याची फक्त आठवण!
आपल्या मुलांच्या नशीबी नाही इतकं श्रीमंत बालपण !!
.....अश्विनी थत्ते