बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (23:39 IST)

वाचतील प्राण तयांचे, ठेवा हा भरोसा!

आवाहन माझे,सर्व बंधू भगिनींना,
जपून फेकावे मास्क तुम्ही फेकताना,
काढून टाका इलास्टिक ,फेकाल जेव्हा,
गुंततात पक्षी त्यात, येता संपर्कात तेव्हा,
खेळ जीवघेणा होतो त्यांच्या सवे,
म्हणून हे भान आम्ही ठेवायला हवे,
करा थोडा प्रयत्न तुम्ही ही जरासा,
वाचतील प्राण तयांचे, ठेवा हा भरोसा!
 कृपया मास्क फेकताना इलास्टिक तेवढं कापून वेगळं करा अन मगच मास्क फेका !!.
....अश्विनी थत्ते