मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 (15:20 IST)

अंगणातला प्राजक्त नाही मुळात आसक्त

अंगणातला प्राजक्त नाही मुळात आसक्त,
अलग होऊन विखरतो, देणच त्यास ठाऊक फक्त,
अंगा खांद्यावर फुलं मिरवत बसत नाही तो,
अंगण कुणाचं ही असो, सडा पाडतो तो,
वैराग्याचा रंग केशरी, देठातच असतो,
म्हणूनच कदाचीत चटकन अलग तो होतो,
रिक्तता त्यास जास्त जवळची म्हणून भरभरून देतो,
स्वतः जवळ ठेवत नाही काही,फक्त देऊन तो उरतो!
..अश्विनी थत्ते