मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जुलै 2023 (20:10 IST)

Marathi Poem नानाविध दुखण्याचं माहेरघर, म्हणजे मनुष्य

kavita
नानाविध दुखण्याचं माहेरघर, म्हणजे मनुष्य,
ते निस्तरण्यात च निघून जात अख्ख आयुष्य,
शारीरिक दुखणी तर असतातच असतात,
बाहेरून आलेली दुखणी काय कमी ताप देतात !
डोक्याला ताप देणारं दुःख जगू देत नाही,
आकस्मिक दुखणी डोकं वर काढतील, सांगू शकत नाही,
मन पण दुखतं, कोणाच्या टोचून बोलण्यान,
कधी कधी विचित्र वागतात लोकं,
दुखत ते त्यानं,
शारीरिक दुखण्यावर ही औषध आहे,
मानसिक दुखण्यावर एक फुंकर पर्याप्त आहे,
शोधा मलम  सर्वच जण दुखण्यावरचा ,
पळतील दुःख सारेच, होईल प्रवास सुखकर आमचा!
..अश्विनी थत्ते.