शिवलिंगावर जल का अर्पित करतात?
शिवलिंगावर जल अर्पण केल्याचे फायदे
शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तुमच्या कुंडलीतील सर्व दोष दूर होतात. तुमच्यातील ते सर्व दोष दूर होऊ लागतात
शिवलिंगाला नियमित जल अर्पण केल्यास धनप्राप्ती होते आणि समाजात तुमचा मान-सन्मान वाढतो. लोक तुमच्याकडे आदराने पाहू लागतात.
सोन्याच्या शिवलिंगाला जल अर्पण केल्यास तुमचे सर्व त्रास दूर होतात आणि शांती मिळते.
शिवलिंगाला जल अर्पण केल्याने तुमच्या घरात सुख, संपत्ती आणि धन तर येतेच पण त्याचबरोबर शरीर शुद्ध होते.
पौराणिक कथा
एका पौराणिक कथेनुसार ह्याचा संबंध समुद्र मंथनाशी जोडण्यात आला आहे. समुद्र मंथन श्रावण मासात झालं होतं असं मानलं जातं. त्यावेळी जेव्हा देवगण आणि असुर, दोन्ही पक्षांमधे जिथे अमृताची होड होती तेव्हा विष निघाल्यानंतर सगळे भिऊन गेले होते. अशात हा प्रश्न उद्भवला की या विषाचं काय होईल? तेव्हा सगळे प्राणी आणि संपूर्ण विश्वाच्या संरक्षणासाठी महादेव स्वतः ते विष प्याले आणि त्यामुळे त्यांना 'नीलकंठ' असे ही म्हणतात.
विष प्यायल्यानंतर त्यांचे शरीर विषचे उष्णतेने जळू लागले आणि त्यांना शांत करण्यासाठी सगळ्यांनी त्यांच्यावर जल अर्पित केले. ह्यामुळे आजही आपण श्रावण मासात शिवलिंगावर जल अभिषेक करतो.
वैज्ञानिक कारण
वैज्ञानिक तथ्यानुसार ज्या ज्या ठिकाणे शिवलिंग/ज्योतिर्लिंग आहे ते उच्च ऊर्जेचे स्थान आहेत. शिवलिंगामध्ये अत्यंत ऊर्जा असते आणि ही ऊर्जा बाहेरचे तत्वांशी मिळून आणखीन ताप वाढून देते, ह्याला शांत करण्यासाठी शिवलिंगावर जल अर्पित करतात. असं ही मानलं जातं की शिवलिंगावर जल अर्पित करायचा अर्थ आपल्या मनाचा अभिषेक करायचं पण आहे अर्थात आपले तामसिक गुण समाप्त करून देणे. नकारात्मकता जल सह वाहवून देणे ह्याचे कारण निमित्त आहे.