शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified: बुधवार, 21 जून 2023 (17:43 IST)

Shravan 2023 श्रावण यंदा 2 महिन्याचा आणि 8 श्रावण सोमवार

shiva
हिंदू कॅलेंडरनुसार आषाढ महिन्यानंतर श्रावण महिना सुरू होतो. या महिन्यात महादेवाची आराधना आणि श्रावण सोमवार उपवास करण्याचे महत्त्व आहे. यंदा अधिकमास येत असल्याने श्रावण महिना केव्हा सुरू होत आहे आणि कधी संपेल हे जाणून घेऊया.
 
कधी सुरू होतोय श्रावण महिना 2023
हिंदू पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिना सुमारे दोन महिन्यांचा असेल. श्रावण महिना 18 जुलै 2023 पासून सुरू होत असून 15 सप्टेंबर 2023 पर्यंत चालेल. म्हणजेच यावेळी एकूण 59 दिवस श्रावण महिन्याचा लाभ भाविकांना मिळणार असून ते मनोभावे शिवभक्ती करु शकतात. हा शुभ संयोग तब्बल 19 वर्षांनंतर घडल्याचे सांगितले जात आहे. 
 
हा विलक्षण योगायोग कसा घडत आहे ?
वास्तविक वैदिक दिनदर्शिकेत सौर महिना आणि चंद्र महिन्याच्या आधारे गणना केली जाते. चंद्र महिना 354 दिवसांचा असतो. आणि सौर महिना 365 दिवसांचा असतो. दोघांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक असतो आणि तिसऱ्या वर्षी हा फरक 33 दिवसांचा होतो, याला अधिक मास म्हणतात. अशा परिस्थितीत यंदा श्रावण दोन महिने चालणार आहे.
 
श्रावण सोमवार तिथी
पहिला सोमवार - 24 जुलै
दुसरा सोमवार - 31 जुलै
तिसरा सोमवार - 7 ऑगस्ट
चौथा सोमवार - 14 ऑगस्ट
पाचवा सोमवार - 21 ऑगस्ट
सहावा सोमवार - 28 ऑगस्ट
सातवा सोमवार - 4 सप्टेंबर
आठवा सोमवार - 11 सप्टेंबर
 
श्रावण सोमवार पूजा पद्धत
श्रावण सोमवारी सकाळी स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
उजव्या हातात जल घेऊन श्रावण सोमवार व्रताची प्रतिज्ञा घ्यावी.
सर्व देवतांना गंगेचे जल अर्पण करावे.
ओम नमः शिवाय मंत्राचा जप करताना भगवान शिवशंकराचा जलाभिषेक करावा.
भोलेनाथांना पांढरी फुले, पांढरे चंदन, भांग, धतुरा, गाईचे दूध, धूप, पंचामृत, सुपारी, बेलपत्र अर्पण करा.
हे सर्व अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा आणि चंदनाचा तिलक लावा.
श्रावण सोमवारच्या व्रताच्या दिवशी सोमवारच्या व्रताची कथा अवश्य वाचावी व शेवटी आरती करावी.
महादेवाला प्रसाद म्हणून तूप आणि साखर अर्पण करा.