संबंधित माहिती
- जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांची मंगळग्रह मंदिराला भेट
- नववधूने केली मंगळग्रह मंदिरावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी
- जर आपली रास Mesh आहे तर आपल्यावर असेल मंगळदेवाची कृपा, फक्त येथे जाऊन या 3 वस्तू अर्पित करा
- मंगळग्रह मंदिर परिसरात हरविलेले चांदीचे जोडवे भाविकाला केले परत
- अमळनेर :संत सखाराम महाराज वेदपाठशाळेत मंगल बालसंस्कार केंद्राचा शुभारंभ
मंगळग्रह मंदिरात महारुद्र व महाशिव अभिषेक सोहळ्याचे आयोजन
येथील श्री मंगळग्रह मंदिरात महाशिवरात्री निमित्त १८ फेब्रुवारी रोजी महारुद्र व महाशिवाभिषेक महापूजा आयोजित केली आहे.
मंदिरातील मंगळेश्वर महादेवावर अकरा मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी ९ ते ३ या वेळेत सदर महापूजा होईल. दुपारी तीन वाजता महाआरती नंतर तीर्थ महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. या महापूजेनिमित्त मंदिरातील सभा मंडपात कैलास पर्वताची आकर्षक आरास व सजावट करण्यात आली आहे. भाविकांनी तिर्थमहाप्रसाद व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थे तर्फे करण्यात आले आहे.
