रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By
Last Modified: मंगळवार, 14 फेब्रुवारी 2023 (15:55 IST)

जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांची मंगळग्रह मंदिराला भेट

अमळनेर (जिल्हा जळगाव महाराष्ट्र)- येथील श्री मंगळग्रह मंदिराला जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवार दि. ११ रोजी सकाळी भेट दिली.
 
जळगाव येथील जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागात सीनियर असिस्टंट असलेले प्रवीण सोनवणे हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सायकलवर प्रवास करीत अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात आले होते. 
 
यावेळी त्यांच्यासोबत राम घोरपडे, राजू सोनवणे, सखाराम ठाकरे हे देखील होते. गेल्या तीन वर्षांपासून जळगाव सायकलिस्ट ग्रुप सायकलवर मोठ्या प्रमाणावर भ्रमंती करीत आहे. यापुढील प्रवास हा उज्जैन येथील महाकाल येथे करणार असल्याचे नियोजन असल्याचे ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांतून सांगण्यात आले.