रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. मंगळ देव
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 (18:01 IST)

मंगळग्रह मंदिर परिसरात हरविलेले चांदीचे जोडवे भाविकाला केले परत

अमळनेर (जिल्हा जळगाव महाराष्ट्र)- येथील मंगळग्रह मंदिर हे विश्वातील एकमेव मंदिर असून येथे दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. शुक्रवारी मंदिर परिसरात चांदीचे जोडवे सापडल्याने ते भाविकाच्या स्वाधीन करण्यात आले.
 
मंगळग्रह मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने दररोज येथे वर्दळ असते. यातच शुक्रवारी चाळीसगाव येथील महिला भाविकाच्या पायातील चांदीचे जोडवे मंदिर परिसरात हरविले होते. ही बाब मोंढाळे येथील रहिवासी एम.बी.पाटील यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सदर जोडवे हे मंदिराच्या सेवेकऱ्यांना आणून दिले. मंदिराचे सेवेकरी गणेश सपकाळे यांनी लागलीच माइकवर जोडवे हरविल्याची माहिती दिली होती. जोडवे मिळाल्याची माहिती ऐकुन खेडी चाळीसगाव येथील महिला भाविक यांनी काउंटरवर येऊन जोडवे त्यांचेच असल्याची ओळख पटवून देत जोडवे ताब्यात घेतले. 
 
यावेळी मंदिराचे खजिनदार गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते जोडवे आणून देणारे भाविक एम.बी.पाटील यांचा सत्कार करण्यात आला.