शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: सोमवार, 23 मे 2022 (15:16 IST)

माझा शोध संपला होता मला देव समजला होता

मला देव शोधायचा होता... 
कसा दिसतो पहायचा होता...
मी ऐकलं होतं अनेकदा
तो निर्गुण निराकार आहे

पण इथे प्रत्तेक गल्लोगल्ली
त्याचं एक दुकान आहे....
मी गेलोय त्या दुकानांमध्ये अनेकदा
जिथे त्याला कैद करुन ठेवले होते
 
त्याला भेटण्याचे चार्जेस म्हणून 
एक दानपात्र ही ठेवले होते....
मी काही रक्कम त्या दानपात्रामध्ये
अनेकदा टाकली पण
त्याला भेटण्याची संधी
मात्र प्रत्येक वेळेस हुकली.....
 
दर वेळेस असंच व्हायचं
त्याला भेटायचं राहुन जायचं
दुसऱ्या दिवशी नव्या जोमाने
मी दुसरं दुकान गाठायचं...
 
असाच भटकत असताना एके दिवशी
रस्त्यात अपघात झालेला दिसला
मी धावलो, त्याला दवाखान्यात नेले
आणी म्हणून कदचित त्याचा जीव वाचला......
 
शुद्धीवर आल्यावर तो इसम
माझ्याकडे पाहुन बोलला
साहेब माणुसकी हरवलेल्या या जगात
मला तुमच्यात देव दिसला......
 
देव ........ माझ्यात........... !!
मी भानावर आलो
 
नाभीतील कस्तुरीच्या सुगंधाने
वेडावलेल्या हरीणा प्रमाणे
मी ज्याचं अस्तित्व चराचरात
म्हणजे माझ्यातही आहे
त्याला गल्लोगल्ली शोधत होतो...
 
माझा शोध संपला होता
मला देव समजला होता.......

-Social Media