शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. मातृ दिन
Written By ©ऋचा दीपक कर्पे|
Last Updated: गुरूवार, 5 मे 2022 (16:13 IST)

"ती माऊली"

त्या घनदाट वृक्षाला बघून आठवली मला ती माउली
तोच आपुलकीचा गारवा, मायेची ऊब, प्रेमाची सावली
 
तिच्या त्या हिरव्यागार पदरात निवांत पडून राहाणे, 
भुकेची जाणीव होताच गोड़, पिकलेली फळे खाणे
 
पिकलेली पिवळे पानं ती, तिच्या अनुभवांच्या साठवणी
खोलवर रुतलेल्या जड़ा, तिच्या आयुष्याच्या आठवणी
 
उंच आभाळा कडे ताठ मनाने उभी ती तोर्‍यात
सुखात नांदत असलेली तिची मुले-बाळे दूर दरी खोर्‍यात
 
सीमेंट-काँक्रीटच्या जंगलाच्या पलीकडे ते वृक्ष अरण्यात...
प्रेमळ-मायाळू ती माउली भेटते मला वृद्धाश्रमात.....