टण टण वाजली पुन्हा घंटा शाळेची
टण टण वाजली पुन्हा घंटा शाळेची,
कान वाटच बघत होते, ते ऐकण्याची,
घरी राहून राहून गेलो होतो कंटाळून,
उठसुठ मोबाइल वर अभ्यास करून,
दंगा मस्ती मित्रांशी विसरूनच गेलो होतो,
मज्जा शाळेची,मनातून आठवत होतो,
एकदाची सुरू झाली शाळा पूर्वी सारखी,
का कोण जाणे इतक्या काळानंतर वाटत होती नवखी,
काही जणांना आवडलं नव्हतं शाळा सुरू झालेली,
घरी राहूनच अभ्यास करायची सवय त्यांनी केलेली,
होईल सर्व सुरळीत पूर्वी सारख सुरू आता,
महामारी सोबतच आलं पाहीजे जगता,
असं केल्याशिवाय पर्याय तरी आहे का?
तारेवरची कसरत आहे ही, प्रसंग बाका!
....अश्विनी थत्ते