गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: गुरूवार, 31 मार्च 2022 (23:00 IST)

मराठी कविता : देता देता जवळचे "ती"झाली रीती

देता देता जवळचे "ती"झाली रीती,
"तिचाच"खेळ होता, तरीही हसत होती नियती.
होणारच जे जे होणारं होतं सगळं,
अपेक्षा असेल जरी, तरी घडणार न वेगळं.
म्हणून मनाला नेमेची करावं तय्यार अश्या क्षणांना,
डगमगणार ना कदापी, तिच्या खेळांना,
कमी जास्त होणार , यासाठी सज्ज रहावे,
खचून न जावे कधीच, घट्ट उभं राहावयास शिकावे.
निसर्गचक्र शिकवितो आपल्यास जगण्याची रीत,
थकता न कधीच, करावं कार्य अविरत.
...अश्विनी थत्ते