कवीता म्हणजे असतं काय तरी?
कवी लोकं कशी काय उतरवतात कागदावरी?
कवीता कधी कधी अनुभव असतो,
तर कधी स्वप्नात कवी फिरून आलेला असतो,
करायचं असतं खूप काही ते राहतं मनात,
शेवटी काव्य रूपानें लिहिलं जातं वहीच्या पानात,
एखादी घटना विचलित करते , उलथापालथ होते,
काव्य स्फुरते त्यावर, मन थोडं हलकं होते,
सुंदर ता ही डोळ्यात भरते चटकन,
ओळी होतात तयार अन कवीता सुचते पटकन,
कुणाचं करायचं असतं कौतुक भरभरून,
साथ घ्यावी लागते शब्दांची,दरी निघते भरून,
प्रेम व्यक्त करायचा तर हा रामबाण उपाय ,
आकाशातले तारे येतात हातात, आणि काय काय!
चार ओळीत सुद्धा काम भागत केव्हा केव्हा,
पान च्या पान निळी होतात, मन भरत नाही जेव्हा!
अशी असते बाबा ही दुनिया थोडी वेगळी,
कवी लोकांची तऱ्हा जरा न्यारी असते सगळी!
....अश्विनी थत्ते