रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. जागतिक महिला दिन
Written By
Last Modified: सोमवार, 7 मार्च 2022 (15:32 IST)

महिलादिनी सत्कार असतो स्त्री शक्तीचा

महिलादिनी सत्कार असतो स्त्री शक्तीचा,
जयजयकार व्हावा तिचा, तिच्यातल्या मातृशक्तीचा,
पण एक न उलगडलेले कोडे मनास पडते,
खरंच एक स्त्री दुसऱ्या स्त्री च मन जाणते?
समस्त जगाकडून अपेक्षाच अपेक्षा,
परंतु एका स्त्री ची दुसऱ्या स्त्री कडून उपेक्षा!
विचार असता न!, एकमेकींच्या आदराचा,
प्रशच उदभवला नसता, अनैतिक संबंधाचा,
 कधी ही वाकडं पाऊल पडलं नसतं, 
मोह आवरून तिनं जर "त्याला"नाही म्हटलं असतं!
वाचले असते अनेक संसार, कित्येक अवहेलना,
सहृदयी जर असतील तितक्याच त्याही ललना!
दुसरी च्या जागी आपल्याला नेहमी ठेवून बघावं,
परस्त्री, नवऱ्याच्या आयुष्यात आल्याचं दुःख समजावं!
....महिला दिनाच्या शुभेच्छा !!
तो ही व्हावा आदराचा हीच इच्छा!!
...अश्विनी थत्ते