* प्रेम म्हणजे काय हे फक्त महिलाच जाणू शकतात
* नारी तू घे अशी उंच भरारी, फिरून पाहू नकोस माघारी
* जिथे नारीची पूजा होते तेथे देवता वास्तव्यास असतात.
* तू तुझ्या डोळ्यात आणू नकोस पाणी
तू तर आहेस रणरागिणी झांशीची राणी.
* जो स्त्रीचा अपमान करतो तो आईचा अपमान करतो,
जो आईचा अपमान करतो, देवाचा अपमान करतो
आणि जो देवाचा अपमान होतो,
त्याचा विनाश निश्चित आहे.
* सशक्त नारी घडवेल सशक्त समाज.
* स्त्रियांना दिला मान तरच वाढेल देशाची शान
* स्त्री म्हणजे एक सुंदर कविता आहे
* मी सुद्धा स्पर्शू शकते आकाश, फक्त संधी मिळायचा अवकाश.
* तिला भिती वाटत नाही म्हणून ती खंबीर नाही तर
ती भयापुढेही नमत नाही म्हणून ती शक्तीशाली आहे
* नारी तु महान, विश्वाची आहेस शान.
* नारीत शक्ती भारी तिला नका समजू बिचारी
* स्त्री ही ईश्वराने निर्माण केलेली महान शक्ती आहे.
* स्त्रियांचा अपमान म्हणजे साक्षात लक्ष्मी आणि सरस्वतीदेवीचा अपमान आहे
* जेव्हा एक पुरूष शिकतो तेव्हा तो एकटाच सुशिक्षित होतो
मात्र जेव्हा एखादी स्त्री शिकते
तेव्हा तिची पूर्ण पिढी सुशिक्षित होऊ शकते
* एखाद्या कठोर आणि दुराचारीच्या व्यवहाराला
प्रेम आणि मायेने बदलण्याचे सामर्थ्य स्त्रीमध्ये आहे