गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. जागतिक महिला दिन
Written By
Last Updated : सोमवार, 7 मार्च 2022 (15:01 IST)

वेबदुनियाच्या स्त्रीशक्तीला पत्रकारितेत विशेष सन्मान

इंदूर- शहरातील आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त इंदूर प्रेस क्लबच्या वतीने महिला पत्रकारांचा गौरव करण्यात आला. यावेळी वेबदुनियाच्या फीचर एडिटर स्मृती आदित्य यांना दीर्घ सेवा पुरस्कार, मराठी वेबदुनियाच्या रुपाली बर्वे यांना विशिष्ट सेवा सन्मान आणि गुजराती वेबदुनियाच्या प्रमुख कल्याणी देखमुख यांना नारी शक्ती सन्मानाने सन्मानित करण्यात आले.
 
या कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री श्री ओमप्रकाश सकलेचा म्हणाले की, महिला अत्यंत गंभीर आणि स्थिर मनाने काम करतात. शतकानुशतके त्यांना सर्वोत्तम व्यवस्थापन गुरु मानले जाते. हे सिद्ध झाले आहे की ते घर आणि बाहेर दोन्ही ठिकाणी चांगली कामगिरी करण्यास सक्षम आहेत. देशाच्या जीडीपीमध्ये महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने आजही देशात स्त्रीभ्रूणहत्या होत आहेत, ही चिंतेची बाब आहे.
 
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त इंदूर प्रेस क्लबने आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री डॉ.मेहरुनिसा परवेझ, लोकसभा टीव्हीच्या ज्येष्ठ पत्रकार सुश्री संध्या शर्मा आणि माजी खासदार डॉ. भागीरथ प्रसाद विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. 
 
इंदूर प्रेस क्लबचे अध्यक्ष श्री अरविंद तिवारी यांनी आपल्या स्वागत भाषणात म्हटले की, आपल्या स्त्रिया क्षेत्रीय पत्रकारितेत पुरुषांपेक्षा चांगले काम करत आहेत, त्यामुळे त्या राज्यातच नव्हे तर देशात एक विशेष ओळख निर्माण करत आहेत, यावर इंदूर शहराला अभिमान आहे.
 
घुंघट आणि हिजाब नाही हे पाहून आनंद झाला - पद्मश्री डॉ.मेहरुनिसा परवेझ 
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला त्या म्हणाल्या की, आज या सभागृहात घुंघट किंवा बुरखा घातलेल्या नाही, हे स्त्री स्वातंत्र्याचे प्रतीक आहे, हे खूप छान वाटते. त्या म्हणाल्या की, आपल्या महिला प्रगतीच्या आणि विकासाच्या मार्गावर झपाट्याने प्रगती करत आहेत हे खरे असले तरी आजही महिलांमध्ये मागासलेपणा आहे हेही आपण विसरता कामा नये. आपली विचारसरणी अशी आहे की, मुलगा जन्माला आल्यावर समाज बंदुका चालवून आनंद साजरा करतात आणि मुलगी जन्माला आल्यावर रडतात. ही मानसिकता आपण बदलायला हवी. आपण हे करू शकलो तर आपला महिला दिन साजरा करणे सार्थकी लागेल.यावेळी डॉ. परवेझ यांनी काव्या या माध्यमातून महिलांच्या व्यथा मांडल्या.
 
लोकसभा टीव्हीच्या ज्येष्ठ पत्रकार सुश्री संध्या शर्मा म्हणाल्या की, महिलांनी एकदा ठरवलं की ते पूर्ण करुनच दाखवतात. समाज बदलण्याची ताकद महिलांमध्ये आहे. भारतासारख्या देशात राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, महापौर ते मंडळे, विविध आयोग अशा उच्च पदांवर राहून महिला आपली शोभा वाढवत आहेत. 
 
महिलांच्या संकल्पापुढे हिमालयाची उंचीही लहान झाली आहे. त्या पुढे म्हणाल्या की, देशात ज्या प्रकारे स्त्री-पुरुष समानतेला खीळ बसली आहे, त्याचा आमच्या धोरणकर्त्यांनी गांभीर्याने विचार करायला हवा.
 
कार्यक्रमाचे संचालन प्रेस क्लबचे उपाध्यक्ष प्रदीप जोशी यांनी केले तर महासचिव हेमंत शर्मा यांनी आभार मानले.
 यावेळी सर्वश्री दीपक कर्दम, अभिषेक मिश्रा, राहुल वावीकर, विपीन नीमा, महेंद्र सोनगीरा, हर्षवर्धन पंडित, के.एल. जोशी, कमल हेटवाल, मांगीलाल चौहान, शैलेश पाठक, अभय तिवारी, प्रवीण बरनाळे, राजेंद्र कोपरगावकर, मुकेश तिवारी, डॉ.अर्पण जैन, अजय शारदा, धर्मेश यशला, कैलाश यादव, प्रदीप मिश्रा, नीलेश राठोर, नितेश पालवी, डॉ. जोशी, लक्ष्मीकांत पंडित, मनसुख परमार, लोकेंद्र थनवर, प्रमोद दाभाडे, संजय अग्रवाल, उमेश शर्मा, मार्टिन पिंटो यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.
 
यांचा सन्मान करण्यात आला-
 
दीर्घ सेवा सन्मान - 
जयश्री पिंगले, श्रुति अग्रवाल, स्मृति आदित्य, ललिता गौड़, मनीषा दुबे, मीना खान, रुखसाना मिर्जा, नाज पटेल, रजनी खेतान मिश्रा, ऋचा मजुपुरिया, सुश्री लीना मेहरा, सुश्री पीयूषा भार्गव, सुश्री जयश्री तिवारी, सुश्री सीमा शर्मा
 
विशिष्ट सेवा सन्मान-
नीता सिसोदिया, अंकिता जोशी, करिश्मा कोतवाल, प्रियंका पाण्डे, मीनाक्षी शर्मा, नेहा जोशी मराठे, रीना शर्मा, नेहा जैन, नासिरा मंसूरी, रूपाली बर्वे, शालिनी हार्डिया, निकिता रघुवंशी, लवीना फ्रांसिस, उषा नाथ, नेहा दुबे
 
नारी शक्ती सन्मान -
रंजीता ठोंबरे, श्रीमती मीना निमजे, सौदामिनी मजूमदार, गरिमा सिंह, सुमेधा पुराणिक, श्वेता त्रिवेदी, श्रीमती प्रीति मिश्रा, प्रिया व्यास, स्मिता जोशी, कल्याणी देशमुख, आरती मंडलोई, कोमल राजपुरोहित, श्यामली नीमा, रश्मि शर्मा, रक्षा श्रीवास्तव, वंदना जोशी, कीर्ति सिंह गौड़, सुरभि भावसार, दीपिका जोशी, निहारिका शर्मा, रोशनी शर्मा, दीप्ति भटनागर, कविता पाण्डे, परिधि रघुवंशी, श्रद्धा बुंदेला, पूजा परमार, राधा बकुत्रा, डॉ. दीपा वंजानी, अमृता सिंह, पलक चौहान, पूर्वा दाधीच, शालिनी शर्मा, आकांक्षा दुबे, प्रियंका देशपांडे (जैन), डॉ. ज्योति सिंह, दिव्याराजे भोसले, पूनम शर्मा, दीपिका अग्रवाल, खुशबू यादव, राधिका कोडवानी, नीतू मोर, श्रीमती सरिता शर्मा, श्रीमती सरिता काला, श्रीमती नंदा चंदेवा, सान्या जैन, नमिता मिश्रा, गरिमा वर्मा, रुचि वर्मा, स्वाति गुप्ता, सुश्री पूजा मिश्रा, खुशबू शर्मा, श्रद्धा शर्मा, अर्चना पारखी, मेघा जोशी....