रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 29 डिसेंबर 2021 (22:45 IST)

PM-KISAN: 1 जानेवारीला 10 कोटी शेतकऱ्यांना भेट, सरकार 20 हजार कोटी हस्तांतरित करणार

PM KISAN: नवीन वर्षाचा पहिला दिवस देशातील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी खूप खास असणार आहे. वास्तविक, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा 10 वा हप्ता 1 जानेवारी रोजी हस्तांतरित केला जाईल. 
 
किती रुपये हस्तांतरित होणार: पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दुपारी साडेबारा वाजता सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटींहून अधिक रुपये हस्तांतरित करणार आहेत. या योजनेंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2-2 हजार रुपये येतील. 
काय आहे योजना:  PM-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना प्रति वर्ष 6000/- दिले जातात. ही रक्कम तीन समान 4-मासिक हप्त्यांमध्ये दिली जाते. सोप्या भाषेत, वर्षातून चार महिन्यांनी एकदा, पात्र शेतकऱ्याला 2000 रुपये हस्तांतरित केले जातात.
FPOs ला भेट: या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे 351 शेतकरी उत्पादक संस्थांना (FPOs) 14 कोटी रुपयांहून अधिक इक्विटी अनुदान जारी करतील. 1.24 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएम मोदी FPOशीही चर्चा करणार आहेत. यावेळी केंद्रीय कृषिमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.