शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 29 डिसेंबर 2021 (17:45 IST)

येथे पेट्रोल 25 रुपये स्वस्त, 250 रुपये दरमहा खात्यातही येणार, जाणून घ्या कसे

झारखंड सरकारने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 25 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली आहे, पण तुम्हाला हे जाणून आनंद होत असेल, तर थांबा, आधी अटी जाणून घ्या. हा लाभ सर्वांनाच मिळणार नाही.
 
सरकारने आज राज्य स्तरावरून दुचाकी वाहनांसाठी पेट्रोलवर ₹ 25 ची सूट देण्याची घोषणा केली आहे. चारचाकी वाहनधारकांना याचा लाभ मिळणार नाही. हा लाभ 26 जानेवारी 2022 पासून मिळण्यास सुरुवात होईल.
 
त्याचा फायदा राज्यातील रेशनकार्डधारक गरीब लोकांना होणार आहे. ज्या शिधापत्रिकाधारकांकडे दुचाकी किंवा स्कूटी आहे, परंतु त्यांना पेट्रोल भरता येत नाही, त्यांना प्रतिलिटर 25 रुपये सवलत मिळेल.
 
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरणे यांनी सांगितले की गरीब कुटुंबाला दर महिन्याला 10 लिटर पेट्रोल घेण्यावर सूट दिली जाईल. अशाप्रकारे दरमहा 250 रुपये गरीब कुटुंबाच्या बँक खात्यात जमा होतील.
 
तेंडुलकर समितीच्या अहवालानुसार झारखंडमधील 36.96% लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे. याचा लाभ या लोकांना मिळणार आहे.