शुक्रवार, 26 डिसेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: शनिवार, 26 मार्च 2022 (16:20 IST)

सत्य

marathi poem on today scenario
घरे गेली अंगणे गेली
नाती गोती फाटत गेली.. 
प्रेम, जिव्हाळा,माया, ममता
सारी सारी लुप्त झाली.
 
चार-चार बेडरूम्सची घरे झाली!
पण आई वडिल,वृद्धाश्रमी गेली..
आई-वडिलांचे कष्टं.. ऋणं..
सारे मुले विसरून गेली.. 
 
आजीआजोबांची नातवंडं
पाळणाघरातली children झाली
सोडायला बाई, आणायला बाई
घरच्या मायेला पारखी झाली..
 
सारी 'extremely busy' झाली
विचारपूस करीना कोणी..
रक्ताचीही नाती आता
WhatsApp मध्ये बंद झाली..!
 
प्रत्येकाची वेगळी खोली
प्रत्येकाला स्पेस झाली
घरातल्याच माणसांमधल्या
संवादांची होळी झाली..
 
हॉटेलिंगची फॅशन आली 
घरची जेवणे बंद झाली..
Modular च्या kitchen मध्ये सगळी..
बाहेरच जेवुन आली !
 
खोल्यांची संख्या वाढत गेली
माणसे मात्र कुढत गेली..
मी, मला, माझे माझे 
स्वार्थामुळे ममता गेली
चिमुकल्यांची मनेच तुटली..
 
पैशामुळे नीती गेली..
नीतीमुळे मती गेली..
अहो पैशासाठी माणसाने
माणुसकी सोडून दिली
 
फेसबुक, गुगल, सगळे असून
का डिप्रेशनची पाळी आली? 
प्रत्येकाला शुगर, बीपी .. 
हार्टची ही गोळी आली ! 
 
इंटरनेट ने क्रांती केली ! 
मोबाईल ने जादू केली ! 
स्वत:च्याच कोषामध्ये
माणसे आता मग्न झाली.. 
 
माणसे जाऊन यंत्रे आली !
यंत्रांची मग तंत्रे आली ! 
यंत्रे-तंत्रे सांभाळताना
माणुसकीची फरफट झाली..
 
सुखं सांगायला कोणी नाही..
दु:ख ऐकायला कोणी नाही..
'Sharing' च्या या जमान्यात
माणुसकी मात्र उरली नाही..
 
चला यंत्र थोडी बाजूला ठेवूया
विचारपूस करण्या घरी जाऊया
नाती गोती सांभाळुनी 
आपण थोडे जवळ येऊया
 
- सोशल मीडिया