गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (15:55 IST)

वाळू सारखेच असतात न आयुष्यात क्षण

वाळू सारखेच असतात न आयुष्यात क्षण,
समजत नाही केव्हा निसटतात हातून हे कण,
कवडसा जणू पकडल्या सारखा वाटतो,
सांगा बरं केव्हा तो मुठीत बंद होतो!
दिसामागून दिस जातात,कळीच फुल होतं,
उमलत ते अन बघा कसं दरवळू लागतं,
पण एक दिवस येतो, ते गळून पडतं,
निसर्गाच चक्र असंच सुरू राहत,
घट्ट घरून ठेवावं असं काहीच नाही या जगात,
जे आहे ते नष्ट होणार , हेंच असू द्यावं सतत विचारात!
..अश्विनी थत्ते