मंगळवार, 5 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालगित
Written By
Last Modified: गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (18:36 IST)

निसटून गेलं अचानक बालपण कसं?

कुठून तरी अचानक हाक आली,
वेगे वेगे मी ही धावत गेली,
सुटून गेलं होतं आधी काही,
तेच पकडण्याची होती माझी घाई,
सुटले होतं बालपणी चे खेळ काही,
तसेंच होते ओच्यामधली जाई जुई,
पुस्तकातले मोरपीस अजूनही होते,
शेवंती ची जाळी, पिंपळ पान तिथंच होते,
निसटून गेलं अचानक बालपण कसं?
अजूनही मनात येतं, लहान व्हावंसं,
जगीन पुन्हा ते क्षण  मी भरभरून,
देईन हो त्या हाकेला, जाईल पुन्हा निघून!
..अश्विनी थत्ते