शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मराठी दिन
Written By
Last Modified: शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (14:49 IST)

माझं मराठीपण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात

माझं मराठीपण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात
 
संतांच्या शब्दात..इतिहासाच्या पानात
 
तेव्हा हसून सारीजण म्हणलीत
 
आम्ही शोधलं आमचं मराठीपण
 
या भूमीवरील माणसांच्या मनात
 
त्यांच्या जखमात.. त्यांच्या रक्तात
 
त्यातून उसवतात सूर्याची किरणे
 
मराठीपण ओलांडून
 
सार्‍या आकाशाला गवसणी घालणारे
 
-कुसुमाग्रज