सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मराठी दिन
Written By
Last Updated : शनिवार, 26 फेब्रुवारी 2022 (14:43 IST)

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा

माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हे, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या दऱ्या-खोऱ्यातील शिळा
हिच्या संगाने जागल्या दऱ्या-खोऱ्यातील शिळा
 
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या दऱ्या-खोऱ्यातील शिळा
हिच्या संगाने जागल्या दऱ्या-खोऱ्यातील शिळा
 
हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात
हो, हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात
 
नाही पसरला कर कधी मागायास दान
स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली न मान
स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली न मान
 
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या दऱ्या-खोऱ्यातील शिळा
हिच्या संगाने जागल्या दऱ्या-खोऱ्यातील शिळा
 
हा, हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्राच्या बाहूत आहे समतेची ग्वाही
हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्राच्या बाहूत आहे समतेची ग्वाही
 
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगे जागतील मायदेशांतील शिळा
हिच्या संगे जागतील मायदेशांतील शिळा
 
हे, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगे जागतील मायदेशांतील शिळा
हिच्या संगे जागतील मायदेशांतील शिळा
 
हिच्या संगे जागतील मायदेशांतील शिळा
हिच्या संगे जागतील मायदेशांतील शिळा
 
गीतकार : कुसुमाग्रज