शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (08:59 IST)

नारायण सुर्वे, कुसुमाग्रजांच्या कवितांचा आधार घेत फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

दारुवरील कर कमी करणे, एसटी कर्मचारी आंदोलन, परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, शेतकरी मदत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मराठवाडा आणि विदर्भावरील अन्याय, अशा अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. विधानसभा नियम २९३ अन्वये विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर विधानसभेत बोलताना फडणवीस बोलत होते.
 
देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना कवी नारायण सुर्वे आणि कुरुमाग्रजांच्या कवितांचा आधार घेत राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्यात भयाण स्थिती आहे. राज्याला प्रशासक दिसत नाही. आगी लागतात, इथं कुंपनच शेत खात आहे. मुख्यमंत्री हे तेजस्वी पुरुषाचे वारसदार आहेत. त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी ही सदिच्छा असं फडणवीस म्हणाले. त्याचवेळी आज राज्याची अवस्था पाहून हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही प्रचंड वेदना होत असतील. स्वातंत्र्यदेवीची विनवणी आज इतकी खरी ठरेल, याची कल्पनाही कुणी केली नसेल, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.
राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या नाहीत. मात्र, दारुवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना फडणवीसांनी एका कवितेचा आधार घेत राज्यावर हल्ला चढवला.
सूर्यकुलाचा दिव्य वारसा
प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे
काळोखाचे करून पूजन
घुबडांचे व्रत करू नका
जनसेवेस्तव असे कचेरी,
ती डाकूंची नसे गुहा..
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका!
सत्ता तारक सुधा असे,
पण सुराही मादक सहज बने.
करीन मंदिरी,
मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका… अशा शब्दात फडणवीसांनी राज्य सरकारवर टीका केलीय.
कुसुमाग्रज सांगून गेले…किती परखड आहे बघा –
प्रकाश पेरा अपुल्या भवती,
दिवा दिव्याने पेटतसे…
इथे भ्रष्टता, तिथे नष्टता,
शंखच पोकळ फुंकू नका
 
सरकारचे नेमके काय चालले आहे ? असा सवालही फडणवीस यांनी केलाय.
कविवर्य नारायण सुर्वे म्हणतात,
हे हात माझे सर्वस्व,
दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
सांगा, राज्याची स्थिती यापेक्षा वेगळी आहे का? असंही फडणवीस म्हणाले.