शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Updated : बुधवार, 6 एप्रिल 2022 (10:17 IST)

म्हणूनच वेळीच सावरावं, एकमेकांना

mother son story
जाणीव होता गोष्टींची आंत काहीतरी नक्की होतं,
याचाच अर्थ असा ही, ते संवेदनशील असतं,
पण हळूहळू जेंव्हा जाणिवा बोथट होऊ लागतात,
मनाची कोमलता, लोकं हरवून मात्र बसतात,
तरीही चालत राहतो प्रवास कसाबसा,
मात्र अजिबात नसतोच तो मुळी हवाहवासा,
अतिरेक झाला की तूटत हे असं नातं पटकन,
कारण मुखवटे धरूनच वावरत असतात दोघे जण,
एकच क्षण पुरेसा असतो, अविवेकाचा,
संपून जातो प्रवास, त्यांचा आजपर्यंत चा,
म्हणून च वेळीच सावरावं, एकमेकांना,
द्यावा वेळ, घ्यावं मत द्यावी ऊब परस्परांना!!
...अश्विनी थत्ते