शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: सोमवार, 18 एप्रिल 2022 (20:39 IST)

जिकडं पाहावं तिकडे ह्याचाच आहे बोलबाला

दुसऱ्याला जवळ करता करता, आपले दूर सारले,
एका मोबाईल मूळ हे सारे विपरीत घडले,
न कोणाची पर्वा न काळजी कुणाची,
सतत डोकं मोबाईल मध्येच, तमा कशाची,
कुठं जाण्यात रस उरला नाही, न कुणाची भेट हवी,
त्यातच रंगून जायचं, फक्त मोबाईल ची संगत असावी,
कुणी टोकल कुणी बोललं, तर राग येतो भारी,
तेवढं सोडून बोला, मग खुश साऱ्यांची स्वारी,
आपलं माणूस असतं आजूबाजूला बोलायला,
हे लोकं मात्र मशगुल, दुसऱ्याशी लाडायला,
जिकडं पाहावं तिकडे ह्याचाच आहे बोलबाला,
लहानांपासून मोठ्यांपर्यंत लागले त्याच्या तालावर नाचायला!
...अश्विनी थत्ते