वाट रविराजाची कोणी बरं अडविली
वाटे सारे स्तब्ध जाहले, गती जीवनाची थबकली,
किंचीत संकोचून कळी ही उमलायची थांबली,
वाट रविराजाची कोणी बरं अडविली,
रथाचे घोडे घोडदौड करीत किंचित रेंगाळली,
येतो असाही एक दिवस , वाटे सर्वच शांत,
मी ही शाल पांघरून बघतो सारे,
पण मन अशांत!
किरणे ही अडकून बसली,सुटेना गुंता,
सोडून द्यावे विधत्यावर कधी कधी,न करावी चिंता!
अश्विनी थत्ते
...अश्विनी थत्ते